वाहतूक दळणवळण

राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकांना अँड्रॉइड तिकीट यंत्रे देण्यात येणार

मुंबई, दि. २
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील ३५ हजार वाहकांना येत्या १५ जूनपर्यंत ३८ हजार ५०० अँड्रॉइड तिकीट यंत्रे दिली जाणार आहेत. यामुळे एसटीमधील प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून होणारा वाद संपुष्टात येणार आहे. प्रवाशांना येत्या काही दिवसांत गुगल पे, कार्ड पेमेंट, फोनपे यांसारख्या डिजिटल पद्धतीने तिकीट काढता येणार आहे.

पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता

मुंबई आणि ठाणे विभागाला २ हजार ५०० यंत्रे प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली असून येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई- ठाण्यातील एसटी वाहक प्रत्यक्ष या नव्या यंत्रांचा वापर करणार असल्याचे सांगण्यात आले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *