धर्म संस्कृती

मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार- दीपक केसरकर

मुंबई, दि. २
मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून येथे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. या सर्व परिसराचे सुशोभीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

पर्यटन आणि कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन केली जाईल, असे प्रतिपादन मुंबई शहर पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभीकरणाच्या कामांच्या सद्यस्थितीचा पालकमंत्री केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंढरीच्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईमध्ये पर्यटन वाढीसाठी मोठी क्षमता आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभीकरणाची जी कामे सुरू आहेत ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आवश्यक आहे ती तातडीने घ्यावी, असेही केसरकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट

मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, कोळीवाडे, माहीम रेती बंदर ते दादर चौपाटीपर्यंत सी साईड वॉक वे, वरळी समुद्र किनाऱ्यावरील इमारतींवर लाईट आणि लेझरद्वारे रोषणाई, तेथील सुशोभीकरण, शिवतीर्थ येथील परिसराचे सुशोभीकरण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरूस्ती आणि सुशोभीकरण, खोताची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने जतन आणि संवर्धन आदी प्रकल्पांबाबत या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *