दहावीचा राज्याचा एकूण निकाल ९३. ८३ टक्के;
गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का घसरला
– निकालात कोकण विभागाची आघाडी
मुंबई, दि. २
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा राज्याचा एकूण निकाल ९३. ८३ टक्के लागला आहे. या निकालात कोकण विभागाने आघाडी घेतली असून
कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के लागला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीप्रमाणे दहावीचा निकालाचा टक्काही घसरला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राचा निकाल ९६. ९४ टक्के लागला होता.
इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली होती.
रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली.
पर्यटन आणि कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून यंदा दहावीत ९५.८७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे प्रमाण ९२.०५ टक्के आहे.
राज्यातील ५ लाख २६ हजार २१० विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, ३,३४,०१५ द्वितीय श्रेणीत तर ८५,२१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालात अपंग विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२. ४९ टक्के आहे
ठाणे शहरात ४७ शाळा अनधिकृत, इंग्रजी माध्यमांच्या ४२ शाळांचा समावेश
दहावीच्या निकालात १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. ही आकडेवारी पुणे- ५, औरंगाबाद- २२, मुंबई- ६,
अमरावती- ७, लातूर- १०८, कोकण- ३ अशी आहे.
निकालाची विभागवार टक्केवारी खालीलप्रमाणे
पुणे- ९५.६४ टक्के, नागपूर- ९२.०५ टक्के, औरंगाबाद- ९३.२३ टक्के, मुंबई- ९३.६६ टक्के, कोल्हापूर- ९६.७३ टक्के, अमरावती- ९३.२२ टक्के, नाशिक- ९२.२२ टक्के,
लातूर- ९२.६७ टक्के आणि कोकण- ९८.११ टक्के
——