संस्कृति

रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष उभारण्यासाठी ‘शिवसृष्टी’ निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रायगड किल्ल्यावर दिली.

रायगड किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री मंडळातील इतरही मंत्री यावेळी उपस्थित होते.

प्रतापगडच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकारण स्थापन करण्यात येणार असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले असतील, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

लंडनच्या संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ही पाठपुरावा करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *