मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे दि.३० :- मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या १३० व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या १ते ३ जून दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ जून रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेगे वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण आणि संस्थेच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात येणार आहे हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होईल.
मुंबईसह राज्यातील सर्व धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
२ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर असून अरुण म्हात्रे आणि महेश केळुसकर सूत्रसंचालन करणार आहेत. ३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘मराठी भाषा विचार’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी, लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार सहभागी होणार आहेत.
गृहप्रकल्पांच्या जाहिरातीत येत्या १ ऑगस्टपासून क्युआर कोड बंधनकारक – महारेराचा निर्णय
तर संध्याकाळी पाच वाजता ‘वाचन संस्कृती ग्रंथालय आणि आपण’ या विषयावर महाचर्चा होणारा असून या महाचर्चेत ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, दीपक करंजीकर, मिलिंद बल्लाळ, जयू भाटकर सहभागी होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे (पश्चिम) येथे होणार असून कार्यक्रमांसाठी साहित्यप्रेमींना विनामूल्य प्रवेश आहे.
