ठळक बातम्या

मुंबईसह राज्यातील सर्व धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.३० :- मुंबईसह राज्यातील सर्व धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे केली.

गृहप्रकल्पांच्या जाहिरातीत येत्या १ ऑगस्टपासून क्युआर कोड बंधनकारक – महारेराचा निर्णय

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार 

मुंबईतील २२६ धोकादायक इमारतींपैकी २७ इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर शिंदे यांनी, राज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून संरचनात्मक परीक्षण करून घ्यावे, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *