गृहप्रकल्पांच्या जाहिरातीत येत्या १ ऑगस्टपासून क्युआर कोड बंधनकारक – महारेराचा निर्णय
मुंबई दि.३० :- महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांना येत्या १ ऑगस्टपासून प्रकल्पांच्या जाहिरातीत क्युआर कोड ठळकपणे नमुद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या माहितीच्या बाजूलाच क्यूआर कोड ठळकपणे दाखविणे अत्यावश्यक केले आहे. प्रकल्पाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने महारेराने हा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार
ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांना घरखरेदी करणे सोपे व्हावे यासाठी महारेराकडून विविध निर्णय घेण्यात येतात. मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासह प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोड द्यायला महारेराने सुरुवात केली आहे.
देश अन् धर्म वाचविण्याविषयी हिंदू बोलत असतील तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? अधिवक्ता सुभाष झा
नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. समाजमाध्यमावरील जाहिरातीतही क्यु आर कोड असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
