स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी – रवींद्र चव्हाण
मॉरिशस दि.२९ :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रखर विचार आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले दायित्व आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल (रविवारी) मॉरिशस येथे केले. मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
मुख्य न्यायमूर्ती फक्त तीन दिवसांचे!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० जयंती आणि या संमेलनाच्या निमित्ताने मॉरिशस येथे उभारण्यात आलेल्या सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन हे ही यावेळी उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी बंधू-भगिनींनी २०० वर्षे आपली हिंदू संस्कृती जपली आहे. या देशात मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य त्यांनी केले आहे, असेही चव्हाण म्हणाले.
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगावर आता नियंत्रण
मॉरिशस हौसिंग आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितीन बापू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सी.एस्.के. असंत गोविंद आदी यावेळी उपस्थित होते.