ठळक बातम्या

मुख्य न्यायमूर्ती फक्त तीन दिवसांचे!

मुंबई दि.२९ :- मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी रविवारी मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. मात्र धानुका येत्या ३० मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने ते फक्त तीन दिवसांचे मुख्य न्यायमूर्ती असणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी रमेश धानुका

सेवाजेष्ठतेप्रमाणे मुख्य न्यायमूर्ती म्हणून धानुका यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजमध्ये १९ एप्रिल रोजी केली होती. मात्र ती शिफारस मान्य होऊन राष्ट्रपतींच्या संमतीने केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी होण्यासाठी सव्वा महिन्याचा काळ लोटला.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर; संकेतस्थळावर यादी उपलब्ध

२६ मे रोजी केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली. भानुका यांनी रविवारी शपथ घेतली आणि ३० मे रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी फक्त तीन दिवस मिळणार असून गेली अकरा वर्षे न्यायमूर्ती धनुका मुंबई उच्च न्यायालयामध्ये काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *