ठळक बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी रमेश धानुका

मुंबई दि.२८ :- मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. रमेश देवकीनंदन धानुका यांनी रविवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगावर आता नियंत्रण

सुरुवातीला राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पटणार यांनी न्या. धानुका यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. न्या. धानुका २३ जानेवारी २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर; संकेतस्थळावर यादी उपलब्ध

शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *