बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर; संकेतस्थळावर यादी उपलब्ध
मुंबई दि.२७ :- बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या एकूण २२६ इमारतींची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ही यादी महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २२६ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगरे विभागात ६५ तर पश्चिम उपनगरे विभागात १२६ इमारती आहेत.
ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणा-या नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी केले आहे.