ठळक बातम्या

निसर्ग गीतांवर आधारित ‘सृष्टीगान’ कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवली दि.२७ :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ३ जून रोजी निसर्ग बालकविता/गीतांवर आधारित ‘सृष्टीगान’ या नृत्यविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ कवी, गीतकार प्रा. प्रविण दवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.‌

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर; संकेतस्थळावर यादी उपलब्ध

सर्व कविता, गाणी मकरंद वैशंपायन यांनी संगीतबद्ध केली आहेत. संगीत संयोजन गोपाल दोंदडकर, सुखदा भावे- दाबके यांचे तर नृत्य दिग्दर्शन सुनीला पोतदार,शितल कपोले यांचे आहे. निवेदन सौरभ सोहोनी, अनुया धारप यांचे आहे.

 

हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता ठाकूर हॉल, टंडन रस्ता, आयडीबीआय बँकेच्याबाजूला डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *