कर्नाटकातून घालविले आता महाराष्ट्रातूनही घालवू- उद्धव ठाकरे
मुंबई दि.१३ :- दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला असून कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला मतदारांनी नाकारले आहे. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकांना आवडलेले नाही. कर्नाटकातून घालवले आता महाराष्ट्रातूनही घालवू, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे केले.
सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय जाहिरातीत नाव आणि छायाचित्राचा वापर
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची बैठक ‘मातोश्री’ येथे आयोजित करण्यात आली होती.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने देशातील राजकारणाची दिशा बदलली – नाना पटोले
या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर तसेच कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर चर्चा झाली. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल सर्व आमदारांना समजावून सांगण्यात आला. हा निकाल आपल्या बाजूने कसा आहे हे ही सांगण्यात आले. पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.