राज्यभरात उद्यापासून पुन्हा तापमानवाढ होण्याची शक्यता
मुंबई दि.१६ :- राज्यभरात उद्यापासून (बुधवार) पुन्हा तापमानवाढ होण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या अनेक भागात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता आहे.
कर्नाटकातून घालविले आता महाराष्ट्रातूनही घालवू- उद्धव ठाकरे
राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला शहरात नोंदविले गेले.
सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय जाहिरातीत नाव आणि छायाचित्राचा वापर
तर उर्वरित शहरांत हा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान होता. सोमवारी तापमानात एक ते दोन अंशाची घट दिसून आली. मात्र आता बुधवारपासून तापमानवाढीचा इशारा देण्यात आला आहे.