सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय जाहिरातीत नाव आणि छायाचित्राचा वापर

सायबर पोलिसांकडून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई दि.१३ :- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, छायाचित्र आणि आवाजाचा वापर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन तेंडुलकरचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. एका औषध तयार करणाऱ्या कंपनीने त्यांच्या जाहिरातीत सचिन तेंडुलकरने उत्पादने वापरल्याचा दावा केला.

राहुल गांधी यांचया ‘भारत जोडो’ यात्रेने देशातील राजकारणाची दिशा बदलली – नाना पटोले

तसेच सचिनहेल्थ डॉट इन नावाचे बनावट संकेतस्थळ तयार करून त्यावरूनही सचिन तेंडुलकरच्या छायाचित्राचा वापर करून उत्पादनाचा प्रचार केला जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन सचिन तेंडुलकरने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.