पालकांना महागाईचा आणखी एक झटका, शालेय बस शुल्क येत्या १ एप्रिलपासून वाढणार
मुंबई दि.२४ :- मुंबईतील शालेय बस शुल्कात येत्या १ एप्रिलपासून १५ ते २० वाढ करण्याचा निर्णय ‘स्कूल बस असोसिएशन’ने घेतला आहे. शालेय बस शुल्कात गेल्या वर्षीच तीस टक्के शुल्कवाढ करण्यात आली होती.
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन
इंधन दरवाढ, बसच्या साहित्याच्या वाढलेल्या किमती, नवीन बसचे वाढलेले दर, बस चालक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेली वाढ इत्यादी कारणांमुळे शालेय बस शुल्कात वाढ केली जाणार असल्याचे ‘स्कूल बस असोशिएशन’चे म्हणणे आहे