ठळक बातम्या

दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

मुंबई दि.२४ :- हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. सरकार गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा २ हजार २०६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

‘परिणीता’, ‘लगा चुनरी में दाग’, ‘हेलिकॉप्टर इला’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाचे दिग्दर्शनही सरकार यांनीच केले होते. सरकार यांनी चित्रपटांबरोबर अनेक म्युझिक व्हिडीओंचेही दिग्दर्शन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *