स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानावरून विधानसभेत गोंधळ, कामकाज काही वेळासाठी तहकूब
मुंबई दि.२४ :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले. अखेर विधानसभेचे कामकाज वीस मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे गुरुवारी भाजपा-शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोडेमारा आंदोलन केले होते.
पालकांना महागाईचा आणखी एक झटका, शालेय बस शुल्क येत्या १ एप्रिलपासून वाढणार
मात्र, त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी आमदारांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या गोंधळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.