कल्याण डोंबिवली महापालिकेचा २ हजार २०६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
कल्याण दि.२४ :- कल्याण डोंबिवली महापालिकेचा २ हजार २०६ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिका सभागृहात सादर केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची पुन्हा ‘ईडी’ चौकशी
गेल्यावर्षी १ हजार ७७३ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला होता. त्यापैकी १ हजार ६७५ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. १ हजार ३८७ कोटी रुपये विविध विकासकामांवर खर्च करण्यात आले असून सध्या पालिकेकडे २८७ कोटी रुपये शिल्लक आहेत.
मुंबईतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत गुढीपाडव्याला १ हजार ३१९ नव्या वाहनांची नोंद
गेल्या वर्षीच्या जमा खर्चाच्या तुलनेत यंदा ४३२ कोटी रुपयांनी महापालिका प्रशासनाने वाढ केली आहे. अपूर्ण कामांना प्राधान्य देणारा, आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन यावर भर देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
