गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २१
राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो, असेही राज्यपाल बैस यांनी म्हटले आहे.
——