वाहतूक दळणवळण

छेडानगर येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण; मानखुर्द ते ठाणे हा प्रवास अधिक वेगवान

मुंबई दि.१९ :- छेडानगर येथील १ हजार २३५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर मानखुर्द ते ठाणे हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे महापालिका रुग्णालयांतील रुग्णसंख्येत वाढ

पूर्वमुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना छेडानगर जंक्शन येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे एमएमआरडीएने छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीला सुरूवात

यापैकी पहिला तीन मार्गिकांचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. दुसरा दोन मार्गिकांचा १ हजार २३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. तर, तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *