राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे महापालिका रुग्णालयांतील रुग्णसंख्येत वाढ
मुंबई दि.१९ :- जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी सोमवारपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. याचा परिणाम बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयांवर झाला असून महापालिकेच्या नायर आणि शीव रुग्णालयांत येणा-या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीला सुरूवात
संपामुळे जे. जे., जीटी, कामा आणि सेंट जॉर्जेस या रुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या राज्य सरकारच्या रुग्णालयांतील आंतर रुग्ण सेवा आणि शस्त्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्याचपाठोपाठ आता बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण संख्येत घट होत आहे.
खेळण्या बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे क्लेशदायक- राज्यपाल बैस
मात्र त्याच वेळी महापालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागावर ताण वाढला आहे.नायर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये साधारणपणे दररोज १५०० ते दोन हजार रुग्ण येतात. मात्र गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या दोन हजार ५०० ते दोन हजार ७०० च्या घरात गेली आहे.
