बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीला सुरूवात
मुंबई दि.१९ :- बृहन्मुंबई महापालिका इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही इमारत १२९ वर्षे इतकी जुनी आहे. या दुरुस्ती अंतर्गत इमारतीची मंगलोरी कौलांसह छत आणि भिंतीची डागडुजी केली जाणार आहे. मुंबईतील दमट हवामान आणि सततच्या ऊन पावसामुळे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला असलेल्या दगडी भिंतीवर रासायनिक प्रक्रिया होऊन इमारतीच्या दगडांना बुरशी आली आहे, दगडांच्या खाचांमध्ये वनस्पतींची वाढ झाली असून काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत.
खेळण्या बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे क्लेशदायक- राज्यपाल बैस
महापालिका मुख्यालय इमारतीचा घुमट, तुळ्या, कमानी इत्यादी बांधकामांच्या भागांची विशेष दुरुस्ती करून इमारतीचे आयुष्य वाढविणे आणि विविध ठिकाणांहून होणारी गळती थांबविणे ही कामेही केली जाणार आहेत.
बावनकुळे यांनी केलेल्या जागा वाटप विधानावरून शिवसेना (शिंदे गट) संतप्त
स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार असून यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एम देवांग कन्स्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी सुमारे १५ टक्के कमी दराने बोली लावून या कंपनीला विविध करांसह ९ कोटी ९२ लाख रुपयांमध्ये हे काम सोपवले आहे. इमारतीच्या दुरुस्ती कामावर सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
