बावनकुळे यांनी केलेल्या जागा वाटप विधानावरून शिवसेना (शिंदे गट) संतप्त
मुंबई दि.१८ :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील संभाव्य जागावाटपाबाबत विधान केले होते. त्यावरून मुख्यमंत्री शिंदे गट संतप्त झाला आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील नालेसफाईसाठी महापालिका ११ कोटी खर्च करणार
भाजप प्रसिद्धीप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप २४० तर शिंदे गट ४८ जागा लढवेल, असे सांगितले होते. या विधानाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हरकत घेऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट
बावनकुळे यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? मात्र अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये बेबनाव निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे. भाजप-शिवसेना जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो काही निर्णय घेतील त्यांना घेऊ दे, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी व्यक्त केली.