खेळण्या बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे क्लेशदायक- राज्यपाल बैस
मुंबई दि.१८ :- जे वय खेळण्या बागडण्याचे, अभ्यास करण्याचे आहे, त्या वयात लहान मुलांना कर्करोगासाठी उपचार घेताना पाहणे क्लेशदायक आहे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त मुलांनी आपल्या पालकांसह राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
बावनकुळे यांनी केलेल्या जागा वाटप विधानावरून शिवसेना (शिंदे गट) संतप्त
टाटा मेमोरियल सेंटर – इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश स्पोर्टस फाउंडेशन या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अशा परिस्थितीत लहान मुलांची आणि त्यांच्या पालकांची मानसिक स्थिती काय होत असेल याचा अंदाज देखील बांधता येत नाही. या पार्श्वभूमीवर कर्करुग्ण मुलांना तसेच त्यांच्या पालकांना टाटा मेमोरियल सेंटर तसेच अशासकीय संस्थांतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील नालेसफाईसाठी महापालिका ११ कोटी खर्च करणार
राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. टाटा मेमोरियल सेंटरच्या इम्पॅक्ट फाउंडेशन व कृष् स्पोर्टस फाऊंडेशनला राज्यपाल बैस यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश स्पोर्टस फाउंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्करोग तज्ज्ञ डॉ वेंकट राम मोहन व लहर बच्छावत आदि यावेळी उपस्थित होते.