ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
मुंबई दि.१२ :- ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे काल (शनिवार) रात्री मुंबईत निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन कन्या असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. देविदास तेलंग यांच्या ‘नांदी’ या पाक्षिकातून त्यांनी नाट्यपरीक्षण लिहायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी साप्ताहिक‘लोकप्रभा’त नाट्यसमीक्षण केले.
कळवा खाडी पूलावर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाची साकेत दिशेकडील मार्गिका सुरू
पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये रुजू झाल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये नाट्य आणि चित्रपट परिक्षण केले. नाडकर्णी यांनी सुरूवातीची काही वर्षे सुधा करमकर यांच्या ‘लिटील थिएटर’ या बालनाट्य संस्थेत लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून काम केले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने २०१९ या वर्षी ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला होता. उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून त्यांना सहा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मोडून काढण्यासाठी ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याची राज्य शासनाची तयारी
नाडकर्णी यांनी लिहिलेली महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नाडकर्णी यांच्या लेखन शैलीमुळे त्यांचा स्वतःचा असा एक वाचक वर्ग निर्माण झाला होता. त्यांनी लिहिलेले परीक्षण वाचून नाटक किंवा चित्रपट पाहायचा की नाही, हे काही प्रेक्षक ठरवित असत.