मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.११ :- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत तर, ठाण्यापुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मोडून काढण्यासाठी ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याची राज्य शासनाची तयारी
ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
कळवा खाडी पूलावर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाची साकेत दिशेकडील मार्गिका सुरू
यामुळेहार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत.