यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई दि.१२ :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, भावना गवळी, आमदार सदा सरवणकर आदी उपस्थित होते.