‘विविध व्यवसाय संधी आणि माहिती’ याविषयावर प्रदीप पेशकार यांचे व्याख्यान
डोंबिवली दि.१२ :- ब्राह्मण महासंघ आणि ब्राह्मण सभा डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ मार्च रोजी आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत ‘विविध व्यवसाय संधी आणि माहिती’ या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ब्राह्मण सभा, डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हे सत्र होणार असून केंद्र सरकारच्या सूक्ष्म , लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालयाचे सदस्य प्रदीप पेशकार हे या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
विवेक वामोरकर – ९८१९८७००१५
जयंत कुलकर्णी – ९९२०६९५६१५