मुंबईतील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना
सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई दि.१३ :- प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने सात दिवसांत अहवाल सादर करावा आणि त्याआधारे १ एप्रिल २०२३ पासून संपूर्ण मुंबईत या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
‘विविध व्यवसाय संधी आणि माहिती’ याविषयावर प्रदीप पेशकार यांचे व्याख्यान
मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रण, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प आणि मार्च २०२३ अखेर मुंबईत नियोजित जी २० परिषदेची बैठक या पार्श्वभूमीवर चहल यांनी रविवारी तातडीची बैठक बोलाविली होती. त्यावेळी चहल यांनी हे आदेश दिले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, पी. वेलरासू (प्रकल्प), डॉ. संजीव कुमार (पश्चिम उपनगरे), विविध सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, खाते प्रमुख सहभागी झाले होते.
यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
विविध बांधकामे आणि विकास कामांच्या ठिकाणाहून निर्माण होणारी धूळ नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना, सर्व संबंधित भागधारकांना त्याविषयी सूचना देऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची पद्धत आणि उपाययोजना, नियम व सूचना यांचे उल्लंघन केल्यास करावयाची कठोर कारवाई या तीन गोष्टींवर सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.