कळवा खाडी पूलावर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाची साकेत दिशेकडील मार्गिका सुरू
मुंबई दि.११ :- कळवा खाडी पूलावर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाची साकेत दिशेकडील मार्गिका सुरू झाली आहे. ही मार्गिका सुरू झाल्याने साकेत मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे जुन्या कळवा पुलावरील वाहनांचा भार कमी होणार आहे. पूल पूर्णक्षमतेने सुरू झाल्याने ठाणे शहरातून कळवा, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक संपूर्णत: नवीन पुलावरुन करणे शक्य होईल.
‘डिजिटल आर्थिक व्यवहार- साक्षरता आणि सावधानता’ या विषयावर अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचे व्याख्यान
ठाणे -बेलापूर मार्गावरील कळवा पूल हा अरुंद असल्याने दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने जुन्या पूलालगत नवा खाडी पूल निर्माण केला. या पूलावरील सिडको येथून कळव्याच्या दिशेने जाणारी आणि कोर्टनाका येथून कळव्याच्या दिशेने वाहतूक करणारी पूलाची मार्गिका सुरू करण्यात आली होती.
जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परंतु साकेत पूलाचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाला नव्हता. साकेत मार्गिका सुरू नसल्याने साकेतहून कळव्याच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने जुन्या कळवा पूलावरूनच वाहतूक करत होते. त्यामुळे बाळकूम मार्गे येणाऱ्या वाहनांना कळवा येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. आता नवी मार्गिका सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.