विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान- मुख्यमंत्री शिंदे
मुंबई दि.०९ :- सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्याबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर असून या महिलांचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे केले. महिला दिनानिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित विशेष मल्टी मीडिया प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामाच्या ठिकाणी विविध भूमिका महिला यशस्वीपणे सांभाळतात. त्यामागे त्यांचा त्याग असतो. महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रवादीच्या टाळीला भाजपची साथ – शेखर जोशी
केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले, महाराष्ट्र ही कर्तृत्ववान महिलांची भूमी असून महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरण, स्वावलंबन आणि स्त्रियांचा सन्मान ही नवीन भारताची ओळख आहे. डॉ. पुरेचा, इंडियन ऑइलचे अध्यक्ष वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले. नूरजहाँ बेगम हमीद अब्दुल हमीद पांडे (जि. वाशीम), वासंती संपतराव महामुलकर (जि. सातारा). हर्षदा विद्याधर काकडे (जि. अहमदनगर), वनमाला परशुराम पेंढारकर (जि. वाशीम), शोभा गुंडप्पा पारशेट्टी (जि. लातूर) यांचा समावेश होता. कोकण विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त स्वयंसेवी संस्था अशा : श्री सद्गगुरू सदन वाचनालय व अभ्यासिका, घाटकोपर, मुंबई. वनवासी विकास सेवा संघ, उसरोली, मुरुड, जि. रायगड. सहेली ग्रुप, राधाकृष्ण सहनिवास, वडनाका बापटआळी, चिपळूण, जि. रत्नागिरी, आश्रय सोशल फाऊंडेशन पनवेल, जि. रायगड.