डोंबिवली प्राईड रनला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद – रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचा उपक्रम
डोंबिवली दि.०८ :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टतर्फे रविवारी आयोजित केलेल्या भव्य मॅरॅथॉन स्पर्धेला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सावळाराम क्रीडा संकुलाच्या मैदानावरून सकाळी साडेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. सर्वसामान्य नागरिकांसह नामांकित धावपटूही स्पर्धेत सहभागी झाले होते.
Dombivali ; फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा (Video)
स्पर्धेचा पारितोषक वितरण सोहळ्यात मॅरॅथॉन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेले डोंबिवलीकर गजानन माने आणि धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर आठ तास चाळीस मिनिटात पोहून पार करणाऱ्या दहा वर्षे वयाच्या आरव गोळे यांचा सत्कार करण्यात आला.