‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या घरांसाठी येत्या १० मे रोजी सोडत; उद्या जाहिरात
मुंबई दि.०५ :- ‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या ४ हजार ७५२ घरांसाठी येत्या १० मे रोजी सोडत काढण्यात येणार असून याबाबतची जाहिरात उद्या, सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बुधवार, ८ मार्चपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे.
शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागात ९ ते ११ मार्च दरम्यान दहा टक्के पाणी कपात
सोडतीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत विरार – बोळींजमधील २ हजार ०४८ घरांचा समावेश आहे. अल्प आणि मध्यम गटातील ही घरे असून याच्या किंमती २३ लाख ते ४१ लाख रुपये आहेत.
वरळी येथील मैदान महापालिका विकसित वकरणार
ऑनलाईन पद्धतीने तसेच ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल आहे. अर्जदारांची प्रारूप यादी २७ एप्रिल रोजी, तर अंतिम यादी ४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून १० मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे.