मुंबई महानगर प्रदेशातील पुलांखाली सुरक्षा नियमांचे पालन करून वाहनतळ सुरू करावेत
उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मागणी
मुंबई दि.०३ :- मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पुलांखाली आवश्यक त्या सुरक्षा नियमांचे पालन करून वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे गुरूवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.
गोखले पुलाच्या पाडकामासाठी पुढील आठवड्यात मेगा ब्लॉक?
प्रदीप बैस यांनी वकील उदय वारूंजीकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. न्यायालयानेही या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकारसह ‘एमएमआर’ मधील महानगरपालिकांना नोटीस बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस भरतीच्या वेळेस उमेदवारांची होणारी गैरसोय दूर करा- विरोधी पक्षनेते अजित पवार
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली व याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.