पोलीस भरतीच्या वेळेस उमेदवारांची होणारी गैरसोय दूर करा- विरोधी पक्षनेते अजित पवार
मुंबई दि.०३ :- पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत घ्यावी, आदी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केल्या.
जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर बैठक- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबईसह राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. भरती केंद्रांवर तरुण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या निवास, भोजनाची गैरसोय होत असल्यानं, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे पवार म्हणाले.
गोखले पुलाच्या पाडकामासाठी पुढील आठवड्यात मेगा ब्लॉक?
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात भरतीच्या वेळी, गणेश उगले या तरुणाला १६०० मीटर धावल्यानंतर चक्कर आली आणि तो कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबईत भरतीसाठी आलेल्या, अमर अशोक सोलंके या तरुणाला, तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये हृदय विकाराचा धक्का बसला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.