जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जलतरण तलाव शुल्कात विशेष सवलत
मुंबई दि.०३ :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईकर महिलांना जलतरण तलाव शुल्कात विशेष सवलत देण्यात येणार आहे. महापालिकेच्या चारही जलतरण तलावांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या महिलांसाठी राखीव असलेल्या सत्रात प्रवेश घेणा-या महिलांना सभासद शुल्कामध्ये २५ टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.
पोलीस भरतीच्या वेळेस उमेदवारांची होणारी गैरसोय दूर करा- विरोधी पक्षनेते अजित पवार
मोठ्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क १०,१०० रुपयांऐवजीच्या ७,७०० रुपये होईल. तर छोट्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क ८,००० रुपयांऐवजी ६,०८० रुपये होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील पुलांखाली सुरक्षा नियमांचे पालन करून वाहनतळ सुरू करावेत
या योजनेत नोंदणी करायाची असल्यास त्यासाठीची ऑनलाईन लिंक ८ मार्च २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. इच्छुक महिलांनी https.//swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन नाट्यगृह व जलतरण तलावांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी केले आहे.