गोखले पुलाच्या पाडकामासाठी पुढील आठवड्यात मेगा ब्लॉक?
मुंबई दि.०३ :- अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे पाडकाम खूप हळू सुरू आहे. पाडकाम अधिक वेगाने करण्यासाठी पुढील आठवड्यात पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्याची शक्यता आहे.
जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर बैठक- उपमुख्यमंत्री फडणवीस
या रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणीचे काम प्रगतिपथावर असून पूल पाडण्याचे काम रेल्वेतर्फे सुरू आहे. नवीन पुलासाठी तुळई बनवून ती बसविण्याचे काम महापालिकेतर्फे केले जाणार आहे. ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरू आहेत.
जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर बैठक- उपमुख्यमंत्री फडणवीस
स्थानिक आमदार अमित साटम यांच्यासह महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या पाडकामाची पाहणी केली. सलग काही तासांचा मेगा ब्लॉक घेतला तर पाडकमाचा वेग वाढून हे काम जलद गतीने पूर्ण होईल, अशी चर्चा आहे.