जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर बैठक- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई दि.०३ :- विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
टिटवाळा लोकलच्या मालडब्यात बेदम मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी आम्ही नकारात्मक नाही, मात्र राज्याचा आर्थिक ताळेबंद पाहून जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केली जाणार नसल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत सरकार सकारात्मक असून, याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली होती.