ठळक बातम्या

ठाणे परिसरातील महामार्ग, जोड रस्ते, पुल दुरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा- मुख्यमंत्री शिंदे

मुंबई दि.०३ :- ठाणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पुल यांच्या दुरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. या कामांसंदर्भात समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे दिले.
ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुक कोंडी आणि विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानभवनात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

‘एल’ विभागातील खैरानी मार्गावरील काही परिसरात ‘दर शनिवारी’, पाणीपुरवठा बंद

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोजकुमार सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, ठाणे पोलिस आयुक्त जय जीत सिंह, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर महापालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणे शहर आणि परिसरातील मुंब्रा बायपास, घोडबंदर रस्ता ते गायमुख, खारेगाव, साकेत पुलाची दुरुस्ती तसेच नाशिक, अहमदाबाद महामार्गावरील कामे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. जेएनपीटीकडून येणारी आणि जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पार्कींग लॉट करावेत. ट्रॅफीक वॉर्डनची संख्या वाढवावी, अवजड वाहन नादुरूस्त झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी महामार्गावर क्रेन्सची सुविधा वाढवावी, या कामाशी संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागाचा एक समन्वय अधिकारी नेमावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *