काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु- अधिवक्ता सतीश देशपांडे
मुंबई दि.२८ :- देशात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार असूनही हिंदूमध्ये त्यांच्या भूमिकेविषयी संदिग्धता दिसून येते. काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पणा दिनानिमित्त अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने सावरकर भक्तांचा मेळावा दादर येथील पाटील मारूती मंदिरात आयोजित कऱण्यात आला होता. त्यावेळी देशपांडे ‘भाजप काँग्रेसच्या वाटेवर’ या विषय़ावर बोलत होते.
वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारणार
अखिल भारतीय हिंदुमहासभेचे केंद्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले हे अध्यक्ष तर हिंदुमहासभेचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या भूमिकेबद्दल आजही हिंदूमध्ये संदिग्धता आहे, किंबुहना याबाबत ते काँग्रेसच्याही पुढे आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले. भोगले म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारानुसार कार्य आणि कृतीशील अंमलबजावणी करणारा हिंदुमहासभा हाच एकमेव पक्ष आहे.
कर्तव्यावर असताना हदयविकाराच्या धक्क्याने पोलीस शिपायाचा मृत्यू
तर केणी यांनी भाजपच्या शायनिंग वृत्तीचा समाचार घेतला. वाजपेयी सरकारच्या काळात प्रमोद महाजन यांनी शायनिंग इंडियांचा प्रयोग केला तर सध्या मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार विकासाच्या नावाखाली जाहिरातींवर वारेमाप खर्च करत आहे. याच्याआड ते हिंदुत्वावादाला लपवून हिंदूंची दिशाभूल करत आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ ने झाली.