ज्येष्ठ अभिनेते विजय साळवी यांचे निधन
डोंबिवली दि.२७ :- ज्येष्ठ अभिनेते विजय साळवी यांचे वृद्धापकाळाने येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे. अनेक वर्षे विलेपार्ले येथे वास्तव्याला असलेले साळवी गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत राहात होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘माझी जन्मठेप’चे अभिवाचन
बालनाट्य, विविध मालिकांमध्ये तसेच ‘मोरूची मावशी,’ ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकांमध्ये काम केले होते, ‘चार दिवस सासुचे’ या चित्रपटात तसेच आभाळमाया, चिमणराव या मालिकांमध्ये साळवी यांनी विनोदी भूमिका साकारल्या होत्या. आत्माराम भेंडे, विजया मेहता, विनय आपटे यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते.