लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा
मुंबई दि.२७ :- लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर लागू करण्यात यावा, या मागणीसाठी रविवारी नवी मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबईतील कोपरी नाका, सेक्टर २८ येथील चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. भगवे झेंडे, भगव्या पताका हातात घेऊन हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय साळवी यांचे निधन
आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, यासह विविध पक्षीय माजी नगरसेवकही मोर्चात उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘माझी जन्मठेप’चे अभिवाचन
हिंदू समाज संयमी असून त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मोर्चाची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली.