स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘माझी जन्मठेप’चे अभिवाचन
मुंबई दि.२७ :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पण दिनानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे सावरकर यांनी लिहिलेल्या ‘माझी जन्मठेप’च्या अभिवाचनाचा रंगमंचीय अविष्कार सादर करण्यात आला. संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची तर दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांचे होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
अभिवाचनामध्ये अभिजीत धोत्रे, अमृता कुलकर्णी, नवसाजी कुडव, जान्हवी दरेकर, शंतनू अंबाडेकर, मुग्धा गाडगीळ- बोपर्डीकर, कुंतक गायधनी कलाकार सहभागी झाले होते. नाट्यसंपदा कलामंचची ही निर्मिती होती. ‘शतजन्म शोधताना’ महाराष्ट्र सैनिकी विद्यालय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांची ही निर्मिती असलेला ‘शतजन्म शोधताना’ हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना
विविध मान्यवरांची सावरकर स्मारकाला भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पण दिनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यसह दादर परिसरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही स्मारकास भेट देऊन सावरकरांना अभिवादन केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष पथकानेही स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यासमोर मानवंदना दिली.