राजकीय

विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच सरकार कोसळेल- आदित्य ठाकरे

मुंबई दि.२७ :- शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच गद्दारांचे हे अल्पायुषी सरकार कोसळेल,अशी टीका आमदार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल येथे केली. वरळीच्या जांबोरी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत ठाकरे बोलत होते.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अपमान हे विद्यमान गद्दार सरकार करत आहे. वरळी-शिवडी प्रकल्प, सागरी किनारा मार्ग, उद्याने, उड्डाणपूल, मैदाने आदि कामे आमचे सरकार करत होते. या कामांना स्थगिती देऊन पुन्हा एकदा कंत्राटे काढली जात आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विजय साळवी यांचे निधन

हे सरकार ईडी सरकार नसून बीसी ( बिल्डर आणि कॉन्ट्रक्टर ) सरकार बनले आहे, आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. वरळीतून माझी अनामत रक्कम जप्त होईल असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुमच्याविरोधात ठाण्यातील कोपरी – पाचपाखाडी या तुमच्या विधानसभा मतदरसंघात येऊन निवडणूक लढवेन, असे आव्हानही ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *