कर्तव्यावर असताना हदयविकाराच्या धक्क्याने पोलीस शिपायाचा मृत्यू
मुंबई दि.२७ :- कर्तव्यावर असताना हदयविकाराच्या धक्क्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुलुंड येथे घडली. रामा महाले ( ४८) असे या पोलीस शिपायाचे नाव असून, ते मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मुलुंड पोलीस ठाण्यातील मोबाईल क्रमांक १ या पोलीस वाहनावर ते चालक म्हणून ते कर्तव्यावर होते.
शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी- नाना पटोले
रविवारी मुलुंड परिसरात गस्त घालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तत्काळ त्यांना परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मुलुंड पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे.