शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी- नाना पटोले
मुंबई दि.२७ :- राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तुर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
बृहन्मुंबई महापालिकेत ६५० परिचारिका पदासाठी भरती
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारला सभागृहात जाब विचारू व शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारला भाग पाडू, असेही पटोले म्हणाले.
विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच सरकार कोसळेल- आदित्य ठाकरे
२०१४ साली केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासूनच देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. भाजपा सत्तेचा दुरुपयोग करत असून देशात सध्या अघोषीत आणीबाणी आहे. विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात असल्याचेही पटोले यांनी सांगितले.