राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना
मुंबई दि.२७ :- चीन, हाँगकाँग, पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेतलेला संशयित दहशतवादी मुंबईत दाखल झाल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहोचल्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे.
मुंबई सागरी किनारा मार्ग येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार
सरफराज हा मध्यप्रदेशातील असून तो भारतासाठी धोकादायक आहे. पोलिसांना त्याची ओळख पटावी यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडून त्याचा चालक परवाना, पारपत्र, आधारकार्डची प्रत मुंबई पोलिसांना ईमेलद्वारे पाठविण्यात आली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास संस्थेला मुंबईवर हल्ल्याबाबतचा ईमेल मिळाला होता. तो पाकिस्तानातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
पाच सदस्यांनाही सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करता येणार
त्याआधी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश मिळाला होता. सोमालिया देशातील भ्रमणध्वनी क्रमांकावरून हा संदेश पाठविण्यात आला होता.