मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई दि.२७ :- सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासह लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिली.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना
आपण स्वत:, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी यावी, अशी विनंती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबई सागरी किनारा मार्ग येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनीही यावेळी आपले म्हणणे मांडले.