ठळक बातम्या

गुणवत्तापूर्ण पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि.२५ :- विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचे महत्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

Bigg Boss 16 फेम शिव ठाकरे शिवतीर्थवर; ‘राज’भेटीचे कारण गुलदस्त्यात

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ या वर्षाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांच्या वितरण कार्यक्रमात केसरकर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नवाब मलिक यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर पुढील आठवडय़ापासून सुनावणी

राज्याच्या महिला धोरणांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर दोन आदर्श महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यातील किमान एक महिला शिक्षक असेल, असे लोढा यांनी सांगितले. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनीही मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *